योग्य अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड कशी करावी!

बारावीच्या परिक्षेचे निकाल लागल्यानंतर योग्य अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करताना पालक आणि विद्यार्थी चिंतातूर होतात.मग महाराष्ट्रात अनेक महाविद्यालय असताना योग्य महाविद्यालय कसे निवडायचे हा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. या लेखामध्ये अशा (अभियांत्रिकी) महाविद्यालयांच्या गुण वैशिष्ट्यांचा ऊहापोह केलेला आहे. ज्यांच्या आधारे विद्यार्थी  योग्य अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करु शकतील. ही गुण वैशिष्टे स्वेरीज अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूरचे उदाहरणे देवून स्पष्ट केलेली आहेत.  प्रवेशासाठी योग्य महाविद्यालयाची निवड करताना खालील बाबी विचारात घेणे गरजेचे आहे.

मुख्य सुविधा-एखादे महाविद्यालय निवडताना विचारात घ्यावयाच्या अनेक बाबीमधील सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्या महाविद्यालयातील मुख्य सुविधा. केवळ आकर्षक इमारत म्हणजेच सर्वकाही नव्हे. मुख्य सुविधांमध्ये संबधित महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेनुसार उपलब्ध असणार्‍या सोई-सुविधांचा समावेश होतो. ज्यामध्ये वर्ग खोल्या, प्रशासकीय इमारत, संगणक प्रयोग शाळा, इतर प्रयोगशाळा इ.चा समावेष होतो. कारण अभियांत्रिकी पदवीच्या चार वर्षाच्या कालावधीत या सर्व सुविधा तुमच्यासाठी आवश्यक असतात. म्हणून अशा सुविधांना प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे.

स्वेरीमधील मुख्य सुविधा-एकूण क्षेत्र २७एकर,एकूण बांधकाम २२४६१ चौ.मी., एकूण वर्ग खोल्या २८,

Bulding_01

एकूण प्रशासकीय खोल्या –२८ , एकूण प्रयोग शाळा –५४ ,

प्रयोगशाळा गुंतवणूक- मेकॅनिकल इंजिनिअरिंग (२.२५ कोटी), कॉम्प्यूटर सायन्स इंजिनिअरिंग (२.७ कोटी),

इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (२.१२  कोटी), सिव्हील इंजिनिअरिंग (१.२५ कोटी)

उद्योगांना विद्यार्थ्यांकडून अपेक्षीत असलेल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी त्यायोगे त्यांना रोजगार क्षमता बनविण्यासाठी आवष्यक सॉफ्टवेअर्स,चार उच्च क्षमतेचे संगणक-सर्वर्स आणि उच्च क्षमतेचे ६००  संगणक उपलब्ध आहेत.

शिक्षकवृंद-एखादे योग्य महाविद्यालय निवडताना केवळ मुख्य सुविधा हाच शिक्षक क्षमता घटक महत्वाचा नसतो, तर उच्चविद्याविभुशीत शिक्षक क्षमता देखील आवश्यक असतो. त्यादृष्टीने संबंधीत महाविद्यालयातील किती शिक्षक पीएच.डी.धारक तसेच पदवीत्तर शिक्षण घेतलेले आहेत ते पाहणे आवश्यक आहेत. शिवाय शिक्षकः विद्यार्थी प्रमाण किती आहे आणि बाहय तज्ञांचे मार्गदर्शन (गेस्ट लेक्चर) याही गोष्टी महत्वाच्या आहेत. स्वेरीमध्ये १८ शिक्षक पीएच.डी.पदवी धारक आहेत. तर १५ शिक्षक पीएच. डी.पदवी धारण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. तसेच ८२ शिक्षकांनी पदवीत्तर पदवी शिक्षण पुर्ण केले आहे. (काही महाविद्यालयांमध्ये केवळ प्राचार्य हेच पीएच.डी. पदवी धारक असतात.) दर वर्षी विविध नामांकित शैक्षणिक  संस्थामधील 100 पेक्षा जास्त तज्ञ जसे आय.आय. टी, आय.आय.एस.सी, भाभा अणुसंशोधन केंद्र, इत्यादी महाविद्यालयास भेटी देतात तसेच औदयोगिक क्षेत्रातील तज्ञमार्गदर्शक ही आमंत्रित केले जातात.

शैक्षणिक कार्य आणि शिक्षण प्रणाली- विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन यशामध्ये त्यांचे शैक्षणिक कार्य/गुणवत्ता महत्वाची असते. खास करुन जे विद्यार्थी शैक्षणिक पार्श्वभुमी नसलेल्या वातावरणातून येतात.त्यांना अभियांत्रिकीचे प्रथम वर्ष उर्तीर्ण होण्यात अनेक अडचणी येतात. त्या दृष्टीने एखादे महाविद्यालय निवडताना त्या महाविद्यालयातील प्रथम वर्षाचा निकाल लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रथम वर्षाच्या विध्यार्थ्यांचे परिक्षेतील यश हे त्या महाविद्यालयातील शिक्षण प्रणालीवर अवलंबून असते. त्यासाठी संपुर्ण अभ्यासक्रम योग्य प्रकारे शिकवला जाणे, योग्य सराव आणि कमकुवत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन या तीन गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

उदा.शिकवणी मुक्त शैक्षणिक वातावरण सराव आणि विध्यार्थ्यांसाठी खास समुपदेशन यांचा परिणाम म्हणून गतवर्षी प्रथम वर्षाचा प्रथम सत्राचा निकाल विद्यापीठात  सर्वोच्च आहे.

रोजगार संधी- एखादे महाविद्यालय निवडताना संबंधीत महाविद्यालयांकडून प्राप्त करुन दिल्या जाणार्‍या रोजगार संधी विचारात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा रोजगार संधी अनेक घटकांवर अवलंबून आहेत. जसे मुख्य सुविधा शिक्षक वर्ग महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना दिलेल्या सोई-सुविधा विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता, व्यक्तीमत्व विकास इत्यादी.

उदा. मागील सहा शैक्षणिक वर्षात स्वेरीमधून विविध शाखांतर्गंत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या-

अ. क्र शाखा २०११-१२ २०१२-१३ २०१३-१४    २०१४-१५   २०१५-१६   २०१६-१७
१. मेकॅनिकल ६७ ५६ ५२ ९५ ६१ ५३
इलेक्ट्रानिक्स अॅण्ड टेले.कम्यु. ६० ७८ २२ ५५ ९२ ९२
    ३ कॉम्प्यूटर सायन्स अॅण्ड इन्फोर्मेशन  टेक्नोलॉजी ८८ ७९ ८५ ५३ १०२ ८७
सिव्हील १५ ०४ १७ ०२ ०६ ०७
एम.बी.ए २० १६ २९ १३ १५ ६५
                            एकूण २५० २३३ २०५ २१८ २७६ ३०४

संशोधन कार्यः-एखादा महाविद्यालयातील शिक्षकांचा व शिक्षणाचा दर्जा ठरविण्यासाठी संबंधीत महाविद्यालयातील संशोधन कार्य विचारात घेणे आवष्यक आहे. शिक्षक जेवढे उत्तम दर्जाचे असतील तेवढेच संशोधनातुन मिळणारे फायदे ही उत्तम असतात. विद्यार्थ्यांना जर संशोधनासाठी उत्तेजन दिले तर असामान्य विचार करण्यास ते प्रवृत्त होतात. त्यातून त्यांच्यामध्ये उध्योजकतेचे गुण निर्माण होतात. जर शिक्षक संशोधन करत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की, संबंधीत महाविद्यालयाचे व्यवस्थापन उच्च दर्जाचे शिक्षण देण्याबाबत जागरूक  शिक्षकांच्या संशोधन कार्याचे मोजमाप खालील बाबींच्याद्वारे केले जावू शकते.

शिक्षकांनी प्रकाशित केलेले साहित्य, संशोधनात्मक लेख इत्यादी, विविध संस्थांनी जसे भारत सरकारचे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी,आय.सी.टी. इत्यादींनी प्रायोजित केलेले संशोधन प्रकल्प, संबधित महाविद्यालयात संशोधनपर व्याख्यान देण्यासाठी विविध संशोधकांना बोलवले जाते का? संशोधन पर कार्यशाळा संमेल्लनाचे आयोजन केले जाते का उत्तम संशोधनात प्रोसाहीत करण्यासाठी विद्यालयात काही व्यवस्था आहे का? या सर्व बाबी देखील विचारात घेणे आवश्यक आहे.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध तांत्रिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. जसे ऑलंम्पस, एस.टी.टी.पी., शिक्षकांसाठी संम्मेलने इत्यादी. प्रमुख संशोधन क्षेत्राच्या दृष्टीकोनातून पाच विशिष्ठ प्रयोगशाळा विकसित करण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये मायक्रो नॅनो लॅब्रोटरी, रोटर टेस्टींग अॅण्ड डायनामिक लॅब, रोलार चेन लॅब व रुरल हयुमन अॅण्ड रिसोर्स डेव्हलपमेंट फॅसिलीटी यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळांना भेटी देण्यासाठी व स्वेच्छेने कार्य करण्यासाठी प्रवृत्त केले जाते.

     उदा. स्वेरीमधील संशोधन उपक्रम प्राध्यापकांनी २५७ संशोधनात्मक लेख आंतराराष्ट्रीय व राष्ट्रीय नियतकालीकांमधून प्रकाशित केलेले आहेत. शिवाय दोन पेटंन्टस् देखील मिळवले आहेत.संस्थेने विविध संस्थांकडून आकरा संशोधन प्रकल्पामधून सहा कोटीपेक्षा जास्त निधीच्या आधारे उच्च दर्जाची संशोधन सुविधा निर्माण केली आहे. ज्यामध्ये डी.एस.टी, बी.ए.आर.सी., ए.आय.सी.टी.ई.ई. इत्यादी संस्थांचा समावेश आहे. भाभा अणुसंशोधन केंद्रासोबतच्या करारामुळे वीस पेक्षा जास्त संशोधकांनी महाविद्यालयाला भेट दिलेली आहे.त्यामध्ये जेष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ.अनिल काकोडकर यांचाही समावेश आहे.

इतर महत्वाच्या सुविधा- महाविद्यालयाकडून पुरविल्या जाणार्‍या सोई सुविधा हा देखील महत्वाचा घटक आहे. शैक्षणिक कालावधीमध्ये या विविध सुविधा विध्यार्थ्यांना आवष्यक असतात त्यामध्ये ग्रंथालय, इंटरनेट, वसतिगृहे, संमेलन, कक्ष, दवाखाना, विद्यार्थी मंच, जीम व क्रीडांगण इत्यांदींचा समावेश होतो.

उदा. स्वेरीमध्ये २४ तास वाचन कक्ष, १४ तास पुस्तके वाटप, ४६५०० तंत्रविषय पुस्तके, ५००० व्यक्तीमत्व  व स्पर्धा परिक्षा संबंधी पुस्तके, विविध नांमाकित प्रकाशनांची नियत कालीका जसे इ सर्व्हर, आय.टी. ई.,१०३४ एम.बी.पी.एस क्षमतेची इंटरनेट सुविधा. वसतीगृहे- विद्यार्थासाठी १२०० प्रवेश क्षमतेची तीन वसतिगृहे, विद्यार्थीनीसाठी १००० प्रवेश क्षमतेची तीन वसतिगृहे. खानावळ- १० उत्तम दर्जाचे खानावळ,संमेलन सभा कक्ष ६ मोठे कक्ष व १ मोठे व्यासपीठ (३००० जणांची बैठक व्यवस्था असणारे ), औषधालय, इस्त्री तसेच इतर शालेापयोगी साधनांचे दुकान, वैद्यकिय सुविधा २४ तास. मिनरल वॉटर प्लॅंटसृ,२४ तास विद्यूत पुरवठा, एस.बी.आय.चे ए.टी.एम. आणि बॅक ऑफ महाराष्ट्राचे व्हीजीटींग काऊंटर, सुसज्ज जीम, विस्तीर्ण क्रीडांगण, व रात्र सामन्यासाठी प्रकाश दिव्यांची सोइ

इतर उपक्रम- हा देखील महाविद्यालय निवडीमध्ये एक महत्वाचा घटक आहे. कारण अशा उपक्रमाच्या मदतीन विद्यार्थी बाह्य जगात आत्मविश्वाने प्रवेश करु शकतात.

स्वेरी मधील उपक्रम- विध्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्याचा विकास करण्यासाठी तज्ञाकडून खास प्रशिक्षण देले जाते. व्यक्तीमत्व विकास, समुहचर्चा व सादरीकरण सरावासाठी साप्ताहीक उपक्रम आयोजित केले जातात.गेट आणि इतर स्पर्धा परिक्षांच्या संदर्भात तज्ञमार्गदर्शकांकडून प्रशिक्षण दिले जाते.

नावलौकीक व सामंजस्य करार– एखाद्या महाविद्यालयाविशयी इतर लोकांचे काय मत आहे. हेही जाणून घेणे गरजेचे आहे. संबंधीत महाविद्यालयाचे एन.बी.ए., नॅक, इत्यादी संस्थांकडून नामांकन झालेले आहे काय तसेच संबंधीत महाविद्यालयाचे  इतर संस्थांसोबत व उद्योगांसोबत सामंजस्य करार झालेले आहेत काय हे दखील विचारात घेणे आवश्यक आहे.

               उदा.तंत्र शिक्षणातील गुणवत्तेचा सर्वोच्च निकष असणारे एन.बी.ए. मानांकन नुकतेच स्वेरीच्या सर्व अभ्यासक्रमांना मिळाले तसेच  स्वेरीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, नॅक मानांकन, आय.एस.ओ. ९००१:२००८ मानांकित आहे. इन्स्टिटयुशन ऑफ इंजिनिअर्स आणि टी.सी.एस., पुणे यांच्याकडूनही मानांकन झालेले आहे. या महाविद्यालयाने विविध प्रतिष्ठित संस्था जसे बी.ए.आर.सी., मुंबई, आर.आर.कॅट, इंदोर, इन्फोसिस, बेंगलोर, कोनकुक युनिव्हर्सिटी, द. कोरीया, नॉर्ड ड्राईव्ह सिस्टीम, पुणे, जिओ रिलायन्स तसेच इतर ३० पेक्षा जास्त संस्थांशी सामंजस्य करार केलेले आहेत.

    इतर गुण वैशिष्टे- संबंधीत महाविद्यालयाची इतर गुण वैशिष्टे कोणती आहेत. जेणेकरून इतर महाविद्यालयापेक्षा ते अधिक उत्तम ठरू शकते. जसे गरीब व  होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, त्याच्यामध्ये निखळ स्पर्धा निर्माण करणे आणि स्पर्धा परिक्षांसाठी त्यांना प्रोत्साहन देणे, इत्यादी बाबी विचारात घेणे आवयष्क आहे.

उदा. -स्वेरीमधील इतर उपक्रम-कमवा आणि शिका योजनेंतर्गत गरीब व होतकरू विध्यार्थ्यांना वार्षिक ३५ लांखांपेक्षा अधिक मदत

 गुणवत्ता पारितोषके आणि बक्षिसे- या उपक्रमांतर्गत १४ लाखांची मदत ,स्पर्धा परीक्षा, औद्योगिक भेटी, संशोधन व विकास    इत्यादीसाठी विध्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून आता प्रश्न हा आहे की योग्य अभियांत्रिकी महाविद्यालयाची एवढी सगळी माहीती कशी मिळवायची ? या संदर्भात काही महत्वाचे मार्ग खालीलप्रमाणे आहेत.

१.इंटरनेटवरून संबंधीत महाविद्यालयाच्या वेबसाईटला भेट द्या.

२.ज्या पालकांची मुले/मुली सध्या या महाविद्यालयात शिकत आहेत त्यांच्या पालकांना भेट देवून चर्चा करा.

३. तुम्ही निवडलेल्या महाविद्यालयांना वरील मुद्यांना अनुसरून भेटी द्या.

BPR

-प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s